अनेक वर्षापूर्वी जेव्हा सिलसिले मधले 'देखा एक ख्वाब' हे गाणे बघितले होते तेव्हाच मनाशी ठरवले होते की या ठिकाणी मला जायचेय. विविध रंगानी रंगलेले ट्युलिप गार्डन तेव्हा स्वप्नवतच वाटले होते. अशा गार्डन मधे कुणाबरोबर तरी फिरण्याचे स्वप्न तेव्हाच रंगवून टाकले असणार मी. अर्थात तेव्हा कुणाबरोबर वगैरे ते महत्वाचे नव्हतेच. या अशा फुलांच्या ताटव्यांमधुन जाणार्या धुक्याने भरलेल्या वाटा तेवढ्या महत्वाच्या होत्या!
लग्न झाल्यावर नवर्यालाही हे स्वप्न सांगुन झालं पण त्याने सिलसिले हा सिनेमाच पाहीला नसल्याने आणि तेव्हा युट्युब वगैरे काही उपलब्ध नसल्याने मी जे काही वर्णन केलं ते त्याने ऐकून घेतलं आणि फक्त हो जाऊयात इतकच म्हणाला.
आता अनेक वर्षांनीही हे स्वप्न त्या ट्युलिपच्या रंगांएवढेच ताजेतवाने राहिलेय. ती सिनेमामधली बाग हॉलंड मधली आहे वगैरे ऐकीव माहीती मिळाली आणि तिथे जाण्याचा योग कधीतरी यावा अशी एक आशा मनात होती.
मागच्या वर्षी जपान मधल्या हिताचीनाकाकोएन म्हणुन एका पार्कची माहीती मिळाली आणि तिथेही योग्य सिझन मधे गेल्यास ट्युलिपच्या बागा बघायला मिळतील हे कळले. त्याप्रमाणे जायचा प्लॅन होता यावर्षी पण वसंताच्या आगमनाच्या त्याच काही दिवसात भारतात असल्याने यावर्षीही तो चान्स हुकला म्हणुन हळहळतच होते. पार्क कॅलेंडर प्रमाणे एप्रिल चे दोन आठवडे फक्त ट्युलिपचा सिझन असणार होता. मे महिना उजाडल्यावर नेमोफिला नावाच्या निळ्या फुलांचा सिझन चालू होणार होता.
आता ट्युलिप नाही तर नेमोफिला तरी बघावित या विचाराने काल हिताचीनाकाकोएन ला निघाले. बरच लांब असल्याने आणि मी फक्त फोटोग्राफी या उद्देशाने जात असल्याने एकटीच जायचं असे ठरवले.
साधारण तीन एक तास ट्रेन आणि मग बसने प्रवास करुन शेवटी त्या कोएन म्हणजे पार्कच्या गेट पाशी उतरले. तिथे मॅप बघताना उगीचच तिथल्या मुलीला कुठली फुलं आता बघता येतील असा प्रश्न केला आणि तीच्या ट्युलिप या उत्तराने एक आनंदाचा धक्काच बसला. अर्थात पहिली भेट तिथेच दिली.
एकूण ७० प्रकारच्या आणि विविध रंगांच्या या ट्युलिपच्या बागा प्रत्यक्षातही तितक्याच अप्रतिम दिसत होत्या. त्यांचे वर्णन वगैरे करण्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत त्यामुळे तुम्ही सरळ फोटोच पहा.
नेहेमीचा ५डी मार्क २ भारतात ठेवल्याने २०डी आणि त्याची १७-८५ लेन्स आणि १५मिमि सिग्मा लेन्स बरोबर घेतल्या. हा निर्णय अगदी योग्य होता हे मला तिथे गेल्या गेल्या कळलं. १७-८५ लेन्स वाईड अँगल ला नेल्यावर म्हणजे २४ च्या पेक्षा कमी सेटिंगला ठेवल्यावर कॅमेरा हँग होत होता. हा प्रॉब्लेम आधीही आलेला पण मीच इग्नोर केला होता. पण आता मात्र हे सारखच होत होतं. शेवटी सगळेच्या सगळे फोटो १५मिमि सिग्माने काढले आहेत. फक्त ती २०डी वर लावल्याने १५ मिमि ऐवजी २२मिमि सारखी वापरली गेली आणि अल्ट्रा वाईड न दिसता फक्त वाईड दिसली.
best photos......loved it :)
ReplyDeletekhupach chhan aamhi u.s.madhe baghitale tyapekshahi chhan aahet,thanks
ReplyDeleteLovely pictures. Give some more details on how to reach there.
ReplyDelete