त्या दिवशीच मी कॅमेर्याच्या शटरस्पिड बद्दल लिहायला घेतल. आणि मला जाणवल की जोपर्यंत कॅमेरा कसा चालतो त्याच्या आत मधे काय असते हे जाणुन घेत नाही तो पर्यंत पुढचे विषय लिहायला आणी समजायला दोन्ही कठीण आहेत. प्रकाशचित्रण हि एक अशी कला आहे जिचा पायाच भौतिकशास्त्र (Physics), जीवशास्त्र(Biology) आणी तंत्रज्ञान(technology) आहे. त्यामुळे थोड्याफार तांत्रिक गोष्टी येणारच. पण तरिही या गोष्टी थोड्या सोप्या करुन सांगता येतात का बघते. काही जणांसाठी हे कदाचित अगदिच बाळ्बोध होईल. पण ज्यांना अजिबात माहित नाही त्यांच्यासाठीतरि मला इथुनच सुरुवात करावी लागेल.
प्रकाश वापरुन चित्र काढायची पद्धत म्हणे अगदि ख्रिस्तपुर्व ४थ्या पाचव्या शतकात सुद्धा वापरात होती. घाबरु नका हं मी इथपासुनचा पुर्ण प्रवास देणार नाहीए. तेव्हा अशा प्रकाशामुळे पडलेल्या प्रतिमेवरच तेलरंगात खरे खरे चित्र काढायचे. मजाच ना! तेव्हा यामागचा कार्यकारण भाव वगैरे माहित नसावा कदाचित. त्यानंतर १०व्या शतकात एका अरब भौतिकशास्त्रज्ञाने (physicist) प्रथम प्रकाशाचे काही नियम मांडले आणि एक पिनहोल कॅमेरा देखील बनवला. पण तरिही तो साधारण पणे वापरण्यासारखा नव्हताच. मग पुढे १८व्या शतकात फिल्म , प्रोसेसिंगचे वेगवेगळे शोध लागले आणि कॅमेर्याचा चांगला शोध लावुन शेवटी ८मे १८४० मधे ऑफिशियली पेटंट घेतल अलेक्झांडर वॉलकॉटने. त्याच्या वर्षभर आधीच या कलेच बारस झाल होतं 'फोटोग्राफी'. हा शब्द आलाय ग्रीक शब्दावरुन फोटो (प्रकाश) आणि ग्राफी (graphein) म्हणजे चित्र काढणे.
१९ऑगस्ट हा विश्व प्रकाशचित्रण दिन (World photography day * ) म्हणुन साजरा करण्यात येतो. कारण या दिवशी कॅमेरा ऑब्स्क्युरा या कॅमेर्यामधुन पहिली फोटोग्राफीक प्रतिमा घेतली गेली. या शोधाचे जनक होते डॅग्युरो (Louis Daguerre) आणि निस (Joseph Nicéphore Niépce) . आणि या पद्धतीला नाव होते डॅग्युरोटाइप (Daguerreotype)
#
मग नक्की कसे काढतो आपण प्रकाशाने चित्र?
तीन महत्वाचे नियम
- सगळ्या वस्तु आपल्यामधुन प्रकाश परावर्तित करत असतात.
- प्रकाश किरण नेहेमी सरळ रेषेतच प्रवास करतात. पण जेव्हा किरण काचेच्या भिंगातुन (लेन्स) जातो तेव्हा तो आपली दिशा बदलतो. भिंग कसे आहे, कोणत्या प्रकारचे आहे यावर हि दिशा अवलंबुन असते.
- जर हि लेन्स बहिर्वक्र (Convex) असेल तर सगळी प्रकाश किरणे मध्यावरच्या एका बिंदुवर (focal point) एकत्रित येतात.
इथे जीवशास्त्र कुठुन आल असा प्रश्न पडला असेल ना! आपल्या डोळ्याच कार्य अगदी याच प्रकारे चालतं बर. म्हणुन हा शोध थोडाफार जीवशास्त्राशी सुद्धा संबंधीत होतो.
आकृती - http://electronics.howstuffworks.com/camera1.htm
आता जेव्हा एखाद्या वस्तुचे असे प्रकाशकिरण असे भिंगातुन जातात तेव्हा त्या वस्तुची उलटी प्रतिमा पाठिमागच्या पृष्ठभागावर पडते. हि प्रतिमा अगदि शार्प येण्यासाठी हा पृष्ठभाग मात्र त्या नेमक्या बिंदुवर हवा.
आपल्या कॅमेरामधली आपली लेन्स हि भिंग असते. आणि फिल्म किंवा सेन्सर म्हणजे तो पृष्ठभाग असतात. त्याच्या मधे अजुन काही पडदेहि असतात. त्यामुळे लेन्स मधुन येणारा प्रकाश नेहेमी फिल्मवर पडत नाही. जेव्हा आपण फोटो काढण्यासाठी बटण दाबतो तेव्हा काही पळांपुरत तो पडदा उघडतो आणि लेन्स मधुन आलेला प्रकाश मागच्या फिल्म / सेन्सर वर पडतो. मग आपल्याला फोटो मिळतो.
हा प्रकाश कोणत्या प्रकारच्या भोकातुन कितीवेळ जाउ द्यायचा हे ठरवायच म्हणजेच अपेर्चर आणि शटर स्पिड ठरवायच.
आकृती - http://www.math.ubc.ca/~cass/courses/m309-01a/chu/Applications/apps.htm
सगळ्यात सोप्या कॅमेर्यामधे वर दाखवल्या प्रमाणे लेन्स , अपेर्चर, शटर/कर्टन आणी फिल्म असते.
अपेर्चर प्रकाश जाउ द्यायच्या भोकाच माप ठरवत. हा आपला अपेर्चर F
शटर/कर्टन म्हणजे पडदा , हा उघडला कि तेवढ्या पळांपुरत प्रकाश फिल्म वर पडुन मग पडदा लग्गेच बंद होतो. हा काळ ठरवायचा म्हणजेच शटरस्पिड ठरवायचा.
नंतर आलेला आपल्या जिव्हाळ्याचा एसएलआर. सिंगल लेन्स रिफ्लेक्स. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सिंगल लेन्स रिफ्लेक्स टेक्निक फोटोग्राफीचा ऑफिशियल शोध लागण्यापुर्विचे होते. आणि म्हणे कलाकार लोक हे तंत्र वापरुन काचेवर वगैरे चित्र ट्रेस करत असत ! शेवटी १८६१ मधे याचे कॅमेर्यासाठी पेटंट घेउन १८८४ ला पहीले प्रॉडक्शन झाले.
आकृती - http://electronics.howstuffworks.com/camera5.htm
यात वर दाखवल्याप्रमाणे लेन्स मधुन येणारा प्रकाश आरश्यावरुन परावर्तीत केला जातो. तो पेंटॅप्रिझम मधुन व्हु फाइंडर मधे जातो. म्हणजे ज्या गोष्टीचा फोटो काढायचा असतो त्याच बिंब आपल्याला सरळ लेन्समधुन दिसतं. इतके दिवस हि प्रतिमा एका वेगळ्या व्ह्यु फाइंडर नामक भोकातुन दिसायची. प्रत्यक्ष प्रतिमा आणि फोटो यात फारच तफावत असायची. पण एस एल आर मुळे नक्कि कशी प्रतिमा दिसणार हे आधीच कळतं.
नंतर जेव्हा आपण फोटो काढायला बटण दाबतो तेव्हा हा आरसा वर उचलला जातो. आणि कर्टन काही पळभर बाजुला होऊन प्रकाश मागच्या फिल्मवर पडतो. हा आरसा आणि कर्टन हलण्यामुळे खर खटॅक असा एक लयबद्ध आवाज होतो! तर आपल्या सुप्रसिद्ध कॅमेर्याच्या आवाजाचा उगम असा आहे बर. हे एस एल आर च एक ढोबळ रुप. वेळोवेळी लागणार्या बदलांमुळे, प्रत्येक कंपनीच्या डिझाईन मुळे यात बरेच बदल झालेत, होत असतात. पण तरीही हि मुळ संकल्पना तशीच आहे.
सुरुवातीच्या कुठल्याच कॅमेर्यांमधे बॅटरीची गरजच नव्हती. सगळ काम मेकॅनिकल होतं. जेव्हा कॅमेर्याच्या रोलचा शोध लागला तेव्हा सुद्धा एक फोटो काढल्यावर लक्षात ठेवुन एका गोल फिरणार्या बटणाने रोल फिरवुन गुंडाळावा लागायचा. असा रोल गुंडाळला कि मग पुढचा फोटो फिल्मच्या अप्रकाशित (अनएक्स्पोज्ड) भागात घेता यायचा. तुम्ही रोल गुंडाळायला विसरलात की आधीच्या फोटोवरच दुसरा फोटो घेतला जाउन मजेशिर रिझल्टही मिळायचे. माझ्या कडे असलेला सर्वात पहिला क्लिक थ्री कॅमेरा असा होता! दुर्दैवाने वापरायचा बंद केल्यावर तो मी संभाळुन ठेवु शकले नाही. आता त्याचं फार वाईट वाटतय.
मग फिल्म ऐवजी डिजिटल सेन्सर आले आणि प्रतिमा या सेन्सर वर पडायला लागली. त्या सेन्सरचे डिटेल्स पुन्हा केव्हातरी सांगेन.
आता इलेक्टॉनिक्स मधे झालेल्या प्रचंड क्रांतीमुळे कॅमेर्यात इतक्या सोयी दिसतात, रोज नवनविन काहितरि येतच असतात. पण तरिही मुळ कॅमेर्याची संकल्पना अजुनही तशिच आहे, म्हणजे हा शोध लावणारे किती दुरदर्शी असतील नाही! आणि म्हणुनच खरतर अगदी बेसिक एस एल आर असेल तरीही तुम्ही चांगले फोटो काढु शकता, त्यासाठी टॉप ऑफ द मार्केट जायची गरज नाही.
आता ज़रा बेसिक माहिती झालिये आपल्याला. आज तुम्ही फार वैतागला नसाल वाचून तर मग पुढच्या भागात शटरस्पीड बद्दल वाचायला या.
# गुगल सर्च वरुन मिळालेली माहिती
* http://www.worldphotoday.org/
Friday, August 20, 2010
फोटोग्राफी : तुमचा कॅमेरा
Labels:
इतिहास,
एस एल आर,
कॅमेरा,
कॅमेर्याच कार्य,
फोटोग्राफी
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वप्नाली,
ReplyDeleteब्लॉग आवडला !
फोटोग्राफी या विषया वर मराठीत छान माहिती !!
लिहित रहा , वाचतोय .
- संजय
धन्यवाद संजय.
ReplyDeleteतुमच्या प्रतिसादाबद्दल आभार
स्वप्नाली
hi swapnali khup chan mahiti dili aahes tu ithe, photography chya tips shodhatana ha blog milala khup chan ashich help kar new photographers sathi
ReplyDeletethanks,
-sudhir
स्वप्नाली धन्यवाद
ReplyDeleteफार छान माहिती .
पुढच्या भागाची वाट बघतोय ..
फारच जुना लेख आहे ..
ReplyDeleteमी आता वाचला :)