प्रकाशरानातून जाताना
हवे तसे चालत रहावे.
हवी तिथे चौकट आखुन
प्रकाशाचे चित्र निर्मावे
प्रकाशाच्या या रानामध्ये
अंधाराचीहि साथ असावी.
अंधाराशिवाय प्रकाशाला
अर्थपूर्ण मिती नसावी
प्रकाशाची रानफुले
क्षणाक्षणाला पहात जावी.
गंध नुसताच मनात भरून
फुलं चौकटीत बांधुन घ्यावी.
निळ्या सावळ्या ढगांनाही मग
प्रकाशाची किनार यावी.
ढगांसकट पक्षांनाही
माझ्या चौकटीची ओढ लागावी.
Friday, June 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment