कास पुष्प पठार - धावती भेट
केव्हापासून कासला जायचे असे मनात होते. शेवटी या विकेंडला अचानक जायचा प्लान केला. मुलगी बरोबर असल्याने खूप चालता आलं नाही किंवा कुमुदिनी तलावापर्यंतही जाता आलं नाही. पण जे पाहीलं ते फार सुंदर आहे. कासला जायचा रस्ताही खूप मस्त आहे.
यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे असेल किंवा काय माहित नाही फुलांचे गालीचे दिसले नाहीत. कारवी फुलली आहे असे ऐकले पण नेमके आम्ही निघालो तेव्हा ठोसेघर पर्यंत जाताना तुफान पाऊस.समोरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे डोंगर दर्यावर फुलली असेल तरी दिसली नाही.
सनड्यु - दवबिंदू किंवा ड्रोसेरा इंडीका आणि ड्रोसेरा बुरमानी बघण्यामधे लेकीला रस होता कारण ते तिच्या पुस्तकात आहेत. त्यातले नशिबाने दवबिंदू किंवा ड्रोसेरा इंडीका दिसले.

कासला जाताना घाटात ढगांचा खेळ
कासला जाताना घाटात ढगांचा खेळ
कासला जाताना घाटावरच्या पठारावर
ह्युई लुई आणी ड्युई - कावळा ( स्मीतीया बेगेमीना )( नाव पुस्तिकेतून साभार)
(कसला तुरा ते माहीत नाही)
नाव माहीत नाही. नखाएवढे फुल आहे.
नाव माहीत नाही
नाव माहीत नाही. नखाएवढे फुल आहे.
तेरडा
दवबिंदू - ड्रोसेरा इंडीका. किटकभक्षी वनस्पती. नेटवर फ़ोटो बघून मला हे मोठे असेल असे वाटले होते. इथेही फ़ोटोत मोठे वाटले तरी हे अगदी नखाहून छोटे फुल असते. नेमके माहित नसेल तर शोधणे कठीणच. त्याचे दवबिंदू असलेले टेंटाकल्स जेमतेम बोटाच्या पेराएवढे किंवा लहानच असतील. आम्हाला एका ठिकाणी चार पाच फुलं दिसली. एका सिनियर ग्रुपच्या बोलण्यात मधेच नाक खुपसुन विचारल्याने त्यांनी फोटो दाखवला आणि लोकेशन सांगितलं त्यामुळे शोधता आली.
दवबिंदू - ड्रोसेरा इंडीका. सगळं रोप मिळुन जेमतेम दिड दोन इंच उंची होती. एका ठिकाणी मुंगी चिकटलेली दिसतेय. छोटे किटक या चिकट दवबिंदूना चिकटतात. मग ते टेंटाकल्स गुंडाळले जातात आणि किटकांचा रस शोषला जातो.
दवबिंदू - ड्रोसेरा इंडीका. दवबिंदू असलेले टेंटाकल्स जेमतेम बोटाच्या पेराएवढे किंवा लहानच असतील
अभाळी - सायनोटिक्स ( नाव पुस्तिकेतून साभार)
छान. फारच धावती भेट होती बहुतेक! मी मागच्या वर्षी तिथे गेलो होतो. जास्त फुलं नव्हती तेंव्हा. पण मस्त जागा आहे.
ReplyDeleteI read this amazing article and found that it is actually very good and has information for all.
ReplyDeleteसांगली, कोल्हापूर ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो २०२० - २०२१ , सर्व माहिती मोफत मिळवा = visit gruhkhoj .