रंग आणि गंधाची बरसात करणारा ऋतू म्हणून आपण वसंताचं नेहेमी गुणगान गातो. हिरवेगार गालिचे देणाऱ्या वर्षाऋतूचंहि आपण मनापासून कौतुक करतो. शरदऋतूच्या चांदण्यात भिजलेल्या रात्रिंनीही कवींना नेहेमीच भुरळ पाडली आहे. पण शरद किंवा हेमंतामध्ये वातावरणात होणारे इतर बदल मात्र मी कधी फारसे टिपले नव्हते.
इथे जपानमध्ये आलो आणि सुरुवातीचे काही दिवस असेच जवळपास भटकण्यात गेले. नंतर हिवाळा आल्यावर माउंट फुजीवर जाणे होणार नाही अस वाटून आम्ही ऑक्टोबरमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बसने जाता येतं तिथपर्यंततरी जावे असा विचार करून निघालो. शेवटचा बसचा तासाभराच्या प्रवासाचा टप्पा पार करून फुजीच्या मध्यापर्यंत पोचता येतं. त्या प्रवासात घाटातून दिसणारी दरी मात्र अप्रतिम होती. तिथे आजूबाजूला खूप उंच असे दुसरे डोंगर नसल्याने अथांग पसरलेली शेते, छोटे डोंगर, जवळपासचे उन्हात चमकणारे तलाव अस सगळ सुंदर दिसत होतं. मग ढगांच्या कापसात बस शिरली ती बराच वेळ बाहेर पडेना. अचानक एका वळणावर कापसाला मागे टाकून बस वर आली. त्या वळणावर दिसलेलं दृष्य मात्र कधी मनातून पुसताच येणार नाही इतक अवर्णनीय होतं. सगळी झाडे पिवळ्या धम्मक रंगाची आणि मध्ये मध्ये केशरी पानांचा शिडकावा. फक्त दोन सेकंदात हे स्वर्गरूप दाखवून बसने परत एक वळण घेतलं. बस पुढे चालली होती मात्र माझं मन तिथेच त्या वळणावर रेंगाळलं. हि माझी आणि शरदाची पहिली नजरभेट.
काही वेळाने बस थांबली आणि आम्ही उतरलो. इथे मात्र धुक्यात लपंडाव खेळणारी तसलीच पिवळी केशरी झाडं, काळ्या खडकाळ जमिनीतून निघालेली पांढरीशुभ्र निष्पर्ण खोडं आणि मधूनच दिसणारे आकाशाचे निळे तुकडे. स्वर्गच जणू. नेहेमी हिरवीगार झाडे पहायची सवय असलेल्या डोळ्यांना हि धुक्यात लपाछपी खेळणारी लाल केशरी रंगाची उधळण वेडच लावत होती.
जपानमधला हा ऑटम इतकं रंगवून टाकेल असं आधी कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. इथला हा रंगोत्सव शरदऋतू मधे सुरु होउन हेमंतऋतू मधेही चालु असतो. शरद हेमंताच्या या अप्रतिम लावण्याने अशी काही भूल घातली की तिथून परत आल्यावर आमच्या सगळ्याच सुट्ट्या हि रंगपंचमी बघण्यासाठी भटकण्यात जाऊ लागल्या.
हळुहळू कधी, कुठल झाड कसं नटतं हे ही लक्षात यायला लागलं होतं. एरवी मॅपलची हातभरापेक्षा मोठी पानं क्वचित सिनेमामधे पाहिलेली आठवत होती. पण जपानी मॅपलच्या, मोमीजीच्या नाजुकतेने मात्र वेडच लावलं. इतक्या नाजुक, सुंदर, कोरीव पानांचा हा वृक्ष जेव्हा लालचुट्टुक रंगाची शाल ओढतो तेव्हा लक्षलक्ष चांदण्या फुलल्या सारखा दिसतो.
मग कधी दिसतो तो पिवळ्या धम्मक पानांनी डवरलेला गिन्को. तो अजुनही इतका डवरलेला दिसतो कि खाली पसरलेला त्याचा सडा पाहून प्रश्न पडावा 'हा पडलेला पर्णसंभारही नक्की याचाच का?' वार्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर काही पिवळी पाने झाडाचा हात सोडून भिरभिरत, तरंगत खाली येउन विसावतात. आणि खालच्या सड्याला अधिकच समृद्ध करतात. त्या भिरभिरणार्या पानांबरोबर मनही हल्लक होउन तरंगायला लागते.
पहिल्या वर्षाच्या या नेत्रसुखद अनुभवानंतर मात्र शरदाचं आगमन मला रंगदर्शना आधीच जाणवायला लागलं. आकाशाचा बदललेला गूढगंभीर निळाशार रंग, हवेतला एक प्रकासाचा सौम्यपणा, भरदुपारच्या उन्हात सुद्धा आलेला एक सुखद हळवेपणा हे शरदाची वर्दी द्यायला लागतात आणि माझं मन धावत दऱ्याखोऱ्यात डोंगरावर भटकायला जातं. तिथेच तर आधी हजेरी लावतो ना हा, आणि मग हळूहळू सगळ्या जपानला आपल्या कवेत घेतो.
मग दरवर्षीची माझी एक ठरलेली फुजी ट्रीप असतेच. शारदरंगात नटलेला हां पर्वतराज दरवर्षी वेगळी रूपं दाखवतो. कधी धुक्याची मलमल, तर कधी क्षितिजाला कवेत घेणारा निळाभोर रंग. हि निळाई अनंताची. त्या निळाईला स्पर्श करायला मान उंच करणारे पिवळे केशरी सेडार वृक्ष, लाल मॅपल. जणू या तीन मूळ रंगामधूनच सृष्टीला रंगवून काढलं असावं. या रंगाबरोबरच पहिल्या वर्षी तिथे पाहिलेल्या सुंदर पांढऱ्याखोडाच्या काही झाडांचे दर्शन घ्यायला दुसऱ्यावर्षी मी आसुसले होते, पण ते नशिबातच नव्हतं. तेवढी तीच
झाडे वाऱ्यापावसाने उखडून गेली होतं. हा त्या झाडांचा एकच फोटो आहे माझ्याकडे, बाकि फक्त मनात आहेत ती माझ्या.
फुजी ट्रीप नंतर मग धाव असते कुठल्यातरी आरस्पानी पाण्याच्या तलावाकड़े. सुर्योदयाच्यावेळी उठून फेरफटका मारला की अगदी पार तळ दिसणार्या त्या स्फटिकासमान, स्थिर पाण्यात आपलच रुपडं पाहणारे वृक्ष दिसतात. आपला साज शृंगार कसा झाला आहे याची खात्री करत असावेत जणू. त्या वातावरणात एकटच चालताना मन सुद्धा त्या झाडांसारख निशब्द होऊन आपलच प्रतिबिंब शोधायला लागतं .
कधी पायवाटा पिवळ्या सड्याने हळदुल्या करणारे गीन्कोचे सुवर्णवृक्ष सामोरे येतात . प्रत्येकाचा रंग अगदी पारखून घ्यावा इतक्या चोख सोन्याचा. असल्या वाटा पावलांना भुरळ न घालतील तरच नवल. अशा वाटानाही भेट द्यावी ती सकाळीच. पडलेला पर्णसंभार अजुनही तसाच नाजुक असतो. आणि त्यावर कोवळ्या उन्हातल्या सावल्यांचा खेळ सकाळी जितका मनमोहक दिसतो तितका दुपारी नाही दिसत.
या असल्या वाटांनी चालताना श्रम तर होतच नाहीत पण तरीही या सुवर्णसड्यात भिजलेला एखादा असा बाक क्षणभर विसाव्याची ओढ़ लावतोच. या बाकाने असे कित्येक शरद, हेमंत पाहिले असतील पण तरीही प्रत्येक वर्षीचं नाविन्यही त्याला नक्कीच जाणवत असेल. प्रत्येक वर्षाच्या अनुभवाने तो अधिकच समृद्ध होत असेल.
मोकळ्या माळरानावर वारया पावसाशी लढत एकटा उभा रहाणारा एखादा गिन्को एरवी साधाच दिसतो. पण यावेळी बघाल तर दिसतो तो खालच्या हिरवट गवतावर सोनफुले उधळणारा श्रीमंत सुवर्णवृक्ष. या असल्या सुवर्णवृक्षाखाली विश्रांतीला आलेल्या त्या पांथस्थाचा हेवाच वाटावा नाही? असली सोनफुले उशाशी घेउन झोपल्यावर स्वप्न सुद्धा सोनेरी होत असावीत .
कधी एखाद्या वळणावर दिसतात एकमेकांशी स्पर्धा करणारे असे हळदी कुंकुवा सारखे वृक्ष. हिरव्या ऋतूत बेमालूमपणे एकत्र झालेले हे, आता मात्र स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना दिसतात. स्वत:ची एक ओळख निर्माण करतात.
वाटतं, कसला हा उत्साह यांचा! वार्धक्याचे क्षण सुद्धा असे रसरसून जगतात. आनंद वाटत आणि सगळ्यांना विरहाची हुरहूर लावत पानगळ स्वीकारतात. सगळ्या धरणीला सुद्धा आनंद सड्यात न्हाऊ घालतात.
मारुती चितमपल्लींच्या पुस्तकात एकदा वाचलं होतं , कि काही माकडे हिवाळ्यात लाकडाची शेकोटी रचून आग न पेटवता त्या भोवती बसून शेकतात. आणि नंतर ही लाकडे पेटत नाहीत, जणूकाही त्यातलं अग्नितत्व माकडानी खेचून घेतलं असाव. हे असले अग्नीरंगांचे वृक्ष बघितले कि मला त्याची नेहेमी आठवण येते. वाटतं हे वृक्ष स्वतःमधली उरली सुरली धग अशी पानगळीतून पृथ्वीला दान करत असावेत. येणाऱ्या हिवाळ्यापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी तिला पांघरूण देत असावेत.
वाटतं, दातृत्व अस असावं. माणसाकडे ते असणं कधीच शक्य नाही.
इथे जपानमध्ये आलो आणि सुरुवातीचे काही दिवस असेच जवळपास भटकण्यात गेले. नंतर हिवाळा आल्यावर माउंट फुजीवर जाणे होणार नाही अस वाटून आम्ही ऑक्टोबरमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बसने जाता येतं तिथपर्यंततरी जावे असा विचार करून निघालो. शेवटचा बसचा तासाभराच्या प्रवासाचा टप्पा पार करून फुजीच्या मध्यापर्यंत पोचता येतं. त्या प्रवासात घाटातून दिसणारी दरी मात्र अप्रतिम होती. तिथे आजूबाजूला खूप उंच असे दुसरे डोंगर नसल्याने अथांग पसरलेली शेते, छोटे डोंगर, जवळपासचे उन्हात चमकणारे तलाव अस सगळ सुंदर दिसत होतं. मग ढगांच्या कापसात बस शिरली ती बराच वेळ बाहेर पडेना. अचानक एका वळणावर कापसाला मागे टाकून बस वर आली. त्या वळणावर दिसलेलं दृष्य मात्र कधी मनातून पुसताच येणार नाही इतक अवर्णनीय होतं. सगळी झाडे पिवळ्या धम्मक रंगाची आणि मध्ये मध्ये केशरी पानांचा शिडकावा. फक्त दोन सेकंदात हे स्वर्गरूप दाखवून बसने परत एक वळण घेतलं. बस पुढे चालली होती मात्र माझं मन तिथेच त्या वळणावर रेंगाळलं. हि माझी आणि शरदाची पहिली नजरभेट.
काही वेळाने बस थांबली आणि आम्ही उतरलो. इथे मात्र धुक्यात लपंडाव खेळणारी तसलीच पिवळी केशरी झाडं, काळ्या खडकाळ जमिनीतून निघालेली पांढरीशुभ्र निष्पर्ण खोडं आणि मधूनच दिसणारे आकाशाचे निळे तुकडे. स्वर्गच जणू. नेहेमी हिरवीगार झाडे पहायची सवय असलेल्या डोळ्यांना हि धुक्यात लपाछपी खेळणारी लाल केशरी रंगाची उधळण वेडच लावत होती.
जपानमधला हा ऑटम इतकं रंगवून टाकेल असं आधी कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. इथला हा रंगोत्सव शरदऋतू मधे सुरु होउन हेमंतऋतू मधेही चालु असतो. शरद हेमंताच्या या अप्रतिम लावण्याने अशी काही भूल घातली की तिथून परत आल्यावर आमच्या सगळ्याच सुट्ट्या हि रंगपंचमी बघण्यासाठी भटकण्यात जाऊ लागल्या.
हळुहळू कधी, कुठल झाड कसं नटतं हे ही लक्षात यायला लागलं होतं. एरवी मॅपलची हातभरापेक्षा मोठी पानं क्वचित सिनेमामधे पाहिलेली आठवत होती. पण जपानी मॅपलच्या, मोमीजीच्या नाजुकतेने मात्र वेडच लावलं. इतक्या नाजुक, सुंदर, कोरीव पानांचा हा वृक्ष जेव्हा लालचुट्टुक रंगाची शाल ओढतो तेव्हा लक्षलक्ष चांदण्या फुलल्या सारखा दिसतो.
मग दरवर्षीची माझी एक ठरलेली फुजी ट्रीप असतेच. शारदरंगात नटलेला हां पर्वतराज दरवर्षी वेगळी रूपं दाखवतो. कधी धुक्याची मलमल, तर कधी क्षितिजाला कवेत घेणारा निळाभोर रंग. हि निळाई अनंताची. त्या निळाईला स्पर्श करायला मान उंच करणारे पिवळे केशरी सेडार वृक्ष, लाल मॅपल. जणू या तीन मूळ रंगामधूनच सृष्टीला रंगवून काढलं असावं. या रंगाबरोबरच पहिल्या वर्षी तिथे पाहिलेल्या सुंदर पांढऱ्याखोडाच्या काही झाडांचे दर्शन घ्यायला दुसऱ्यावर्षी मी आसुसले होते, पण ते नशिबातच नव्हतं. तेवढी तीच
झाडे वाऱ्यापावसाने उखडून गेली होतं. हा त्या झाडांचा एकच फोटो आहे माझ्याकडे, बाकि फक्त मनात आहेत ती माझ्या.
फुजी ट्रीप नंतर मग धाव असते कुठल्यातरी आरस्पानी पाण्याच्या तलावाकड़े. सुर्योदयाच्यावेळी उठून फेरफटका मारला की अगदी पार तळ दिसणार्या त्या स्फटिकासमान, स्थिर पाण्यात आपलच रुपडं पाहणारे वृक्ष दिसतात. आपला साज शृंगार कसा झाला आहे याची खात्री करत असावेत जणू. त्या वातावरणात एकटच चालताना मन सुद्धा त्या झाडांसारख निशब्द होऊन आपलच प्रतिबिंब शोधायला लागतं .
कधी पायवाटा पिवळ्या सड्याने हळदुल्या करणारे गीन्कोचे सुवर्णवृक्ष सामोरे येतात . प्रत्येकाचा रंग अगदी पारखून घ्यावा इतक्या चोख सोन्याचा. असल्या वाटा पावलांना भुरळ न घालतील तरच नवल. अशा वाटानाही भेट द्यावी ती सकाळीच. पडलेला पर्णसंभार अजुनही तसाच नाजुक असतो. आणि त्यावर कोवळ्या उन्हातल्या सावल्यांचा खेळ सकाळी जितका मनमोहक दिसतो तितका दुपारी नाही दिसत.
या असल्या वाटांनी चालताना श्रम तर होतच नाहीत पण तरीही या सुवर्णसड्यात भिजलेला एखादा असा बाक क्षणभर विसाव्याची ओढ़ लावतोच. या बाकाने असे कित्येक शरद, हेमंत पाहिले असतील पण तरीही प्रत्येक वर्षीचं नाविन्यही त्याला नक्कीच जाणवत असेल. प्रत्येक वर्षाच्या अनुभवाने तो अधिकच समृद्ध होत असेल.
मोकळ्या माळरानावर वारया पावसाशी लढत एकटा उभा रहाणारा एखादा गिन्को एरवी साधाच दिसतो. पण यावेळी बघाल तर दिसतो तो खालच्या हिरवट गवतावर सोनफुले उधळणारा श्रीमंत सुवर्णवृक्ष. या असल्या सुवर्णवृक्षाखाली विश्रांतीला आलेल्या त्या पांथस्थाचा हेवाच वाटावा नाही? असली सोनफुले उशाशी घेउन झोपल्यावर स्वप्न सुद्धा सोनेरी होत असावीत .
कधी एखाद्या वळणावर दिसतात एकमेकांशी स्पर्धा करणारे असे हळदी कुंकुवा सारखे वृक्ष. हिरव्या ऋतूत बेमालूमपणे एकत्र झालेले हे, आता मात्र स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना दिसतात. स्वत:ची एक ओळख निर्माण करतात.
वाटतं, कसला हा उत्साह यांचा! वार्धक्याचे क्षण सुद्धा असे रसरसून जगतात. आनंद वाटत आणि सगळ्यांना विरहाची हुरहूर लावत पानगळ स्वीकारतात. सगळ्या धरणीला सुद्धा आनंद सड्यात न्हाऊ घालतात.
मारुती चितमपल्लींच्या पुस्तकात एकदा वाचलं होतं , कि काही माकडे हिवाळ्यात लाकडाची शेकोटी रचून आग न पेटवता त्या भोवती बसून शेकतात. आणि नंतर ही लाकडे पेटत नाहीत, जणूकाही त्यातलं अग्नितत्व माकडानी खेचून घेतलं असाव. हे असले अग्नीरंगांचे वृक्ष बघितले कि मला त्याची नेहेमी आठवण येते. वाटतं हे वृक्ष स्वतःमधली उरली सुरली धग अशी पानगळीतून पृथ्वीला दान करत असावेत. येणाऱ्या हिवाळ्यापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी तिला पांघरूण देत असावेत.
वाटतं, दातृत्व अस असावं. माणसाकडे ते असणं कधीच शक्य नाही.
अप्रतिम....फ़ोटो जबरा आहेत :)
ReplyDeleteप्रकाशरानातून चालताना.......
ReplyDelete